'आपले कविता संग्रहण'..आवडता विषय निवडा

'आपले कविता संग्रहण'..आवडता विषय निवडा

आठवण

चारोळ्या

प्रेम कविता

फोटो कविता/चारोळी

Tuesday, 27 August 2019

स्वतःचे व्यक्तिमत्व स्वतः साठी

स्वतःचे व्यक्तिमत्व स्वतः साठी पारदर्शक असावे...
लोकांचे बोलणे हे पावसा सारखे असले...
तरीही नेहमी अळूच्या पाना सारखेच...
पाण्याला दूर करत राहावे....

शेवटी एकटाच... २८/८/२०१९ ४:५३am

Sunday, 25 August 2019

जीवन

जीवनात आपल्या काही इच्छा पाण्यासारख्या असतात....
 त्या पकडताना आपले हाथ तर ओले होतात...
पण हातात काही राहत नाही....

शेवटी एकटाच - २५/८/२०१९ १०:४०

Tuesday, 19 May 2015

"" तुझी साथ ""

"" तुझी साथ ""


सुख-दुःखात पावलो पावली...
तू माझ्या जवळ राहा....

दिवस येतील खडतर...
प्रत्येक क्षणात मला पहा....

ठेवीन सर्व सुख तुझ्या पायाशी....
तोकड्या वाटतील सर्व दिशा....

विश्वासाच्या ह्या बंधनाला...
आजन्म साथ देत रहा...

                                             - फक्त तुझाच...
                                                     १९ /०५/ २०१५ दुपार ०४ : १५ 

Saturday, 16 May 2015

तुझ्या विचाराच्या समुद्रात...

तुझ्या विचाराच्या समुद्रात...
तुझ्या विचारात नाव्ह नेताच...
मी सामुद्र मध्यात फ़ासलो....
घेरले मला जिवघेण्या लाटांन्नी...
त्यांना पाहुनही मी थोडासा हसलो...
तुझ्यावरच्या त्या प्रेमाच्या विश्वासाने...
लाटांन्ना झेलत किनार्यपर्यंत पोहचलो....
प्रेम हे असेच असावे...
किनारा भेट्टो ना भेट्टो....
वादळात मी अडकलो....
का अशेच होते प्रेमात....
मीच का अशे दुखावलो...
तिच्या प्रेमाच्या वेड्या आशेत...
एकतर्फ़ी प्रेमात होतो फ़सलो.... 

                                         -शेवटी एकटाच...
                                        १७/०९/२०१२ १२:१३

Sunday, 10 May 2015

दगडाचा देव.

श्रद्धा ठेव स्वतावर...
आणि एकाच वरदान मग....

जीवनातल्या प्रश्नांना सोडवताना,,
जागव तुझ्या मनातली आग...

देव हा तुझ्यातल्या आत्मात आहे,,
दगडात तर जीव सुद्धा नाही...

देवावर विसंभून राहण्या पेक्षा,,
स्व-कष्टाने कामाला लाग...


- शेवटी एकटाच ...१०/५/२०१५ दुपार १२:४६ 

Friday, 1 March 2013

गोड आशेच्या शोधात....



गोड आशेच्या शोधात....

जरासा मी जळत आहे...
जरासा मी विझत आहे....
धुर बनुन हवेत पसरत आहे....
थोड्याश्या प्रेमाखातीर सारखे भटकत आहे....
मनाला कोणाचीतरी गोड आशा आहे....
मनाला कोणाचातरी अजाण शोध आहे....
मीळतात सर्व म्रुगजळा प्रमाणे....
हजारो चेहर्यांमध्ये त्या एका चेहर्यांचा वेध आहे...
का येत नाही असा कोणी जिवनात....
जो कोरेल आपले नाव माझ्या मनात...
जर जराशे माझे डोळे पाणावले....
कवटाळेल तो मला एका क्षणात....
रोजच त्याला शोधतोय...
विचारांत स्वप्न रंगवतोय...
कधितरी भेटेल ह्या गोड आशेत...
पापण्यांच्या तिरावर भेटीनंतरचे चित्र रेखाटतोय...

-शेवटी एकटाच... १५/१२/२०१२ सकाळ १०:२२








Image
येथे CLICK करा आणि आत्ताच आपले लेख आणि कविता आम्हाला पाठवा....ते आम्ही आमच्या ब्लोग वर समाविष्ट करू.... -----CLICK HERE FAST------