'आपले कविता संग्रहण'..आवडता विषय निवडा

'आपले कविता संग्रहण'..आवडता विषय निवडा

आठवण

चारोळ्या

प्रेम कविता

फोटो कविता/चारोळी

Saturday 27 October 2012

तुझ्या काही आठवणी....



आपट्याची पाने देताना पहिला स्पर्श...
जरी त्या गोष्टीस झालेय वर्ष...
मनात आजही तसाच जपलाय...
तुझ्या चेहऱ्यावरचा पहिला हर्ष...

-शेवटी एकटाच...
२४/१०/२०१२ रात्री २:२२

मर्म मनातले....


प्रत्येक आठवणीला चाळून...
दुखः फेकले गळून...
रडवणार्या जखमांचा चोथा...
मनात ठेवला सांभाळून...
      
  -शेवटी एकटाच..
 १५/१०/२०१२ सायंकाळ ०६:०१

तुझा विचार...


 
तिचा विचार करताना...
स्वतःलाच विसरतो...
घायाळ मनाला सामाझावताना....
तिच्या आठवणींत विसावतो...

         -शेवटी एकटाच...
       १७/०८/२०१२ रात्री ०२:३८

आई माझी देवाघरी...


अरे देवा...थोडेशे बोल ना....
आईला नेलेस तुझ्याकडे...
निरोप माझा सांग ना....
उद्या माझा वाढदिवस...
पाठीवरती हव्या....
मला दोन थापा...
गालावरती हवा मला...
तिचा गोड पाप...
आठून ते दिवस...
दाटते डोळ्यांत पाणी...
कोठे नेलेस आई ला...
शोधू कोणत्या रानी...
अशे का केलेस...
का केलास हा घात....
माझ्या प्रिया व्यक्तीला...
का दिलास स्वर्गवास...

-शेवटी एकटाच...१७/१०/२०१२ रात्री ०७:४९

Friday 19 October 2012

___परतीच्या वाटे वरती___



गाऊन सूर गेली.......
जाताना सर्वच घेऊन गेली.....
जाताना ठेवल्या यातना....
अश्रू डोळ्यात ठेऊन गेली....

त्या अश्रूंना सोसताना....
आठवतो प्रत्येक क्षणांना....
कानात का ठेऊन गेली....
तिच्या मंजुळ स्वरांना....

तिच्याच वाटेवरी....
सारखी नजर वळते...
गेलेले क्षण मिळवण्यासाठी....
मन सरख्ये धडपड करते....

सोडली आत्ता आशा....
न येणार ती परत कधी....
जाणार्या तिच्या वाटेवरती....
वाहतो दुर्वांची जुडी...


-शेवटी एकटाच...
१९/१०/२०१२ दुपार १२:०३


Thursday 18 October 2012

कळेल तुलाही कधी....



कळेल तुला माझे प्रेम...
तेंव्हा माझ्यासाठी तरसशील...
अश्रू टिपणारे ओठ माझे...
जेंव्हा तुझ्या गालाजवळ नसतील .....

-शेवटी एकटाच....२३/०८/२०१२ रात्री ०२:०१




Image
येथे CLICK करा आणि आत्ताच आपले लेख आणि कविता आम्हाला पाठवा....ते आम्ही आमच्या ब्लोग वर समाविष्ट करू.... -----CLICK HERE FAST------