'आपले कविता संग्रहण'..आवडता विषय निवडा

'आपले कविता संग्रहण'..आवडता विषय निवडा

आठवण

चारोळ्या

प्रेम कविता

फोटो कविता/चारोळी

Tuesday, 31 July 2012

पाणावलेल्या डोळ्यांनी....


बरसणाऱ्या पावसात...
भिजत राहतो...
प्रत्येक थेंबात...
तिलाच पाहतो...
गरज नाही...
बरसणाऱ्या ढगांची...
पाणावलेल्या डोळ्यांनी....
पावसाला बरसवतो ...

-शेवटी एकटाच...३१/०७/२०१२

आठवणीतले अश्रू...


तुझ्या आठवणीत एक थेंब...
नेहमी पापण्यांत येतो...
दवबिंदू जशे पानावर...
तसाच अगदी चमकतो....

-शेवटी एकटाच...

Monday, 30 July 2012

तू सोडून जाताना...


 
तू सोडून जाताना...
वेळ तेथेच थांबली....
माझ्या अश्रूच्या तुलनेत...
मनानेच बाजी नारली....

-शेवटी एकटाच...३१/०७/२०१२

तिच्या आठवणी...


 
तिच्या आठवणी सारख्या...
घाव करतात मनाला...
तिला विसरण्याच्या प्रयत्नात...
अपुर्या पडतात विसरायला....

-शेवटी एकटाच...३१/०७/२०१२

माझे शब्द तुझी आठवण...


शब्दांच्या जुळजुळवीत...
अंग माझे शहारले...
आठवण तिची झाली...
डोळे माझे पाणावले...

-शेवटी एकटाच....३१/०७/२०१२...

माझ्ये मन...



तुझ्याशी नं बोलल्याने...
चैन मला पडत नाही...
तुझ्याकडेच असावे जशे....
मन माझ्ये लागत नाही...

-शेवटी एकटाच....३१/०७/२०१२

Saturday, 28 July 2012

अश्रू...



करितो मागणी देवाशी...
तिला माझी होऊ दे...
माझ्या नावाचा एखादा थेंब....
तिच्या डोळ्यांत तरू दे...

-शेवटी एकटाच....

Friday, 27 July 2012

माझे प्रेम ...



मरण कधी येणार...
हेच मला काळात नाही...
फक्त आठवण येत राहते...
ती का येत नाही...

का तिला काळात नाही...
मी विचारात राहतो सर्वांना....
बोलायला कोणी भेटले नाही...
तर विचारतो तुझ्या आसवांना...

केले प्रेम तुझ्यावर
समझ माझ्या मना...
घेऊन पुनर्जन्म मी
करेन प्रेम पुन्हा पुन्हा...

-शेवटी एकटाच...२७/७/२०१२ दुपार १२: २२..

Wednesday, 25 July 2012

तुझी आठवण आणि मी....




तुला कशे विसरू...
विसरणे शक्य नाही...
तुझ्या आठवणींत...
जगण्यासही अर्थ नाही...


-शेवटी एकटाच....२६/७/२०१२ @१:३९
Image
येथे CLICK करा आणि आत्ताच आपले लेख आणि कविता आम्हाला पाठवा....ते आम्ही आमच्या ब्लोग वर समाविष्ट करू.... -----CLICK HERE FAST------